फेसबुकमुळे नांदेडच्या ईशानला मिळाले इटलीच्या आईचे प्रेम

Ishan Khan on facebook
Ishan Khan on facebook

नांदेड : जगातील सर्व भाषांमधून, त्यातील साहित्यांमधून आईचे महात्म्य आणि महत्त्व अगदी मोठमोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले आहे. हे ही आपण जाणताे. पण फेसबुकसारख्या आभासी दुनियेत मुला-मुलींचे प्रेमप्रकरणे होत असताना दुसरीकडे आई व मुलगा होण्याची कदाचित पहिलीच वेळ असेल. नांदेडचा ईशान खान आणि इटलीच्या ७० वर्षीय व्यवसायाने चित्रकार जसोपिनीया मानकुसू यांच्यात फेसबुकमुळे आई व मुलाचे नातं तयार झाले आहे. ईशानच्या लग्नासाठी त्या नांदेडला येणार असल्याने आईच्या प्रेमाला जगातील कोणती सीमा नसते हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

शहरातील पिरबुऱ्हाणनगर भागात राहणारा २६ वर्षीय ईशान खान यांची फेसबुकवरून इटलीच्या जसोपिनीया मानकुसू यांच्याशी मैत्री झाली व त्यास ते आता भारतातला आपला मुलगा मानतात. याबाबत इशान ‘सकाळ’शी सांगताना म्हणाला, की जसोपिनीया मानकुसू यांना भारताचे पूर्वीपासूनच आकर्षण होते. तसेच अभिनेता सलमान खानच्या मोठ्या फॅन असून ‘बिईंग ह्युमन’ या संस्थेसोबत काम करतात. एके दिवशी त्याच्या फेसबुक खात्यावर भारतातील काही मुले हिंदीतून चुकीच्या पद्धतीने त्यांना बोलत होते. हे मी त्यांना सांगितले तेव्हापासून त्यांची चांगली ओळख झाली होती.

त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद वाढवत माझ्याबद्दल सर्व माहिती घेतली. माझे लहान असतानाच आईचे छत्र हरवले होते. वडिलांनी मोठ्या प्रेमाने वाढवले. हे सर्व जसोपिनीया मानकुसू यांना संवाद साधताना समजले. तसेच त्यांनाही मुलबाळ नाही व त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्या एकाकी पडल्या होत्या. आमच्या दोघांमध्ये संवाद वाढत गेला. त्यांनी मला नेहमी इटलीवरून गिफ्ट पाठवण्यास सुरवात केली. तसेच कुटुंबाबद्दल सतत विचारणा करत असतात. प्रसिद्ध चित्रकार असल्यामुळे जगभरातील विविध देशांत भ्रमंती सुरूच असते. माझ्या आवडीनिवडी त्यांनी विचारल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक देशात गेले की, तेथून त्या गिफ्ट पाटवत असतात. गेल्यावर्षी त्या मला भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या. औरंगाबाद येथे त्यांना मुंबईहून येण्याचे सोयीचे होते म्हणून औरंगाबाद येथे आमच्या दोघांची भेट झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मला गिफ्ट दिले होते. मी त्यांना वेरूळ येथील लेण्या व औरंगाबाद येथील बीवी का मकबरा दाखविला. त्यांना ते खूप आवडले.

ऑक्टोबरमध्ये ११ तारखेला माझे लग्न होणार आहे. माझ्या लग्नाबद्दल जसोपिनीया आई या खूप उत्सुक आहेत. माझा साखरपुडा झाला त्यावेळी त्यांनी मुलीसाठी साडी गिफ्ट दिली हाेती. तसेच आपली सून कशी असावी यासाठी मला नेहमी सांगत असे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीविषयी आस्थेवाईकपणे विचारणा करतात, असे ईशानने सांगितले.

त्यांच्या आई-मुलाच्या प्रेमामुळे इटलीच्या जसोपिनीया यांची खान कुटुंबीयांशी चांगलीच नाळ जुळली असल्याचे दिसून येते. म्हणणूच आईची माया, तिचे प्रेम, आपल्या मुलाविषयी तिला असलेली ओढ, काळजी, निःस्वार्थी-प्रेम भावना हे साऱ्या जगाने मान्य केले. हे खरंच असल्याचे सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com