नांदेडः किसान मंचचे नांदेडात ३० शेतकरी मेळावे

file photo
file photo

नांदेड:  शेतकरी समाजाला संपुर्ण कर्ज मुक्तीच्या संबधाने सरकारने धोका दिला असून, महाराष्ट्रातील जानकार व लढाऊ शेतकरी नेत्यांनी एकत्रीत येत गठीत केलेल्या किसान मंचचे शेतमजूर सुरक्षा अभियानांर्गत विदर्भातील संपुर्ण जिल्ह्याचा दौरा करुन शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकाराने चालणारे अभियान ६ सप्टेंबरला नांदेडात दाखल होत असून त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ३० ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन असल्याचे किसान मंचचे जिल्हा निमंत्रक मारोतराव कवळे गुरुजी यांनी माहिती दिली.

याबाबत श्री.कवळे यांनी सांगितले की, सरकारच्या शेतकरी विरोधी भुमीकेला कडाडून विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्तीसह शेतकरी शेतमजुरांना अर्थिक व सामाजिक सुरक्षा, शेतीला प्रति एकर मुल्यांकना आधारित कर्जपुरवठा, पेरणी ते काढणी पर्यंतची कामे रोजगार हमी अंतर्गत करण्या सोबतच तरुणांना काम मिळेपर्यंत मानधन व कोणत्याही अटी शर्तीन लावता २०१७ पर्यंतच्या कर्जातून शेतकरी शेतमजुरांची संपुर्ण कर्जमुक्तीची मागणी सरकारकडे करुन नऊ ऑगस्ट रोजी सेवाग्राम वर्धा येथून गांधी आश्रमात पहिला शेतकरी मेळाव घेऊन संपुर्ण विदर्भाचा ग्रामीण भाग ढवळून काढीत मराठवाड्यातला जालना जिल्हा करुन सहा सप्टेंबर रोजी हे अभियान नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहे. त्या संबंधाचे किसान मंचचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून किमान बिरादारीचे गोपाळराव इजळीकर, शेतकरी संघटनेचे व मंचचे समन्वयक सिताराम मोरे व आर.पी.कदम, गुरुदिपसिंग कामठेकर, सदाशिव पाटील मुखेडकर, धोंडीराम बाऱ्हाळीकर, विश्र्वंभर मसलगेकर, विठ्ठलराव चुकाबोटले तजलूरकर, वसंतराव सुगावे, दे.शी.कदम, दत्ता सुळकर, दिगंबर काळे, प्रभाकर बोड्डेवार, जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे, किसान सभेचे अशोकराव लोंढे, या प्रमुखांच्या वतीने ३० शेतकरी शेतमजुरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने पत्रक वाटप, महाराष्ट्रातल्या प्रमुख मार्गाने मागण्यांचे अधिवेशनाचे लिखाण,  कृषक समाज, मराठवाडा बिजोत्पादक शेतकरी संघ अश्‍या अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांना अभियानात सामील करुन घेत हे अभियान दोन ऑक्टोबिर गांधी जयंतीदिनी नाशिकला होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाची भूमीका घेणार असल्याचे सांगण्यात आले.

या मेळाव्यात शेतकरी नेते व किसान मंचचे महाराष्ट्राचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांच्या सह दत्ता पवार, बाबासाहेब देशमुख, दिलीप धोंडगे, संजय पाटील कऱ्हाळे, बळी कामळजकर यांच्यासह अनेक पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते अभियानात असणार आहेत.

या ठिकाणी शेतकरी मेळावे
सहा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता दगलूर तालुक्यातील तमलूर, तीन वाजता बिलोली तालुक्यातील चिटमोगरा, सहा वाजता नायगाव येथील घुंगराळा, सात सप्टेंबरला अकरा वाजता कंधार तालुक्यातील बारुळ, १२ वाजता मुखेड येथील विश्रामगृह येथे बैठक, दोन वाजता बाऱ्हाळी, सायंकाळी सहा वाजता जांब बुद्रुक, आठ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता हदगाव तालुक्यातील कोळी, अकरा वाजता उंचेगाव (दे), साडेबारा वाजता हदगाव येथील विश्रामगृह येथे बैठक, तीन वाजता हिमायतनगर, सायंकाळी सहा वाजता किनवट तालुक्यातील इस्लापुर, नऊ स्पटेंबरला सकाळी अकरा वाजता लोहा तालुक्यातील माळाकोळी, दोन वाजता लोहा, सायंकाळी सहा वाजता किवळा, दहा सप्टेंबरला १० वाजता उमरी तालुक्यातील सिंधी, दीड वाजता मुदखेड तालुक्यातील ईजळी, सहा वाजता लिंबगाव, रात्री आठ वाजता अर्धापुर तालुक्यातील कामठा बुद्रुक या ठिकाणी शेतकरी शेतमजुरांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com