कर्जबाजारीला कंटाळून माजी नगरसेवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

लोहा (नांदेड): जुना लोहा येथील शेतकरी तथा माजी नगरसेवक रमेश माधवराव शेटे (वय ४०) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आज (बुधवार) पहाटे ही घटना घडल्याने लोहा पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे.

लोहा (नांदेड): जुना लोहा येथील शेतकरी तथा माजी नगरसेवक रमेश माधवराव शेटे (वय ४०) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आज (बुधवार) पहाटे ही घटना घडल्याने लोहा पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे.

सततच्या नापिकीला व देना बँकेचे ३५ हजार रुपये असे त्यांनी कर्ज घेतले होते. शेटे हे सततच्या विवंचनेत राहत असत. तसेच एकत्रित कुटुंब पद्धतीत ते कुटुंबप्रमुख असल्याने भावाच्या मुलीचे लग्न करण्यासाठी ते चिंतीत होते. जवळ पैसे नसल्याने जमवाजमव करण्यात समस्या निर्माण होत होत्या. यातच  कर्जाचा बोजा याला कंटाळून माजी नगरसेवक व शेतकरी रमेश शेटे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रमेश शेटे यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. त्यांची मुलगी १२ वीची परीक्षा देत आहे.

अचानक घडलेल्या प्रसंगामुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते व सहकाऱ्यांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. या घटनेने लोहा परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'सुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वतायवढे' असं म्हणतात ते काही खोटं नाही पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूचं दु:ख गिळून 'आधी बारावीची परीक्षा आणि आज पहिला पेपर' असं म्हणत तिने परंपरेला छेद देत प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याची जिद्द ठेवली. शेटे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशाही परिस्थितीत एकुलती एक शिल्पा नावाच्या मुलीने दु:खावेग सावरत बारावीचा (विज्ञान) पहिलावहिला पेपर सोडवला. तीची परीक्षा परभणी येथील जिवण संस्कार महाविद्यालयातून देत आहे. आचानक घडलेल्या प्रसंगामुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला व परीक्षे नंतर अंत्यसंस्कार असा निश्चय केला. त्यास सर्वांनी संमती दिली. तरी एक मुलगी असूनही शिक्षणापासून तिचा निश्चय तसूभरही ढळला नाही हे विशेष !

Web Title: nanded news loha former corporators ramesh shete suicide