माहूरगडावरिल श्री देवदेवेश्वर संस्थानवर गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

बालाजी कोंडे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सर्वप्रथम बालगोपाल यांचे भजन संध्या कार्यक्रम झाला त्यानंतर श्री मुर्तीस मंगल स्नान घालण्यात आले गंध अक्षता, पुष्पमाला समर्पन,विडा समर्पन, त्यानंतर महाआरती करण्यात आली.

माहूर : माहूर गडावरिल श्री देवदेवेश्वर संस्थान देशात प्रसिद्ध तिर्थक्षेत्र, देवस्थान आहे. सोमवारी (ता.14) रात्री बारा वाजता श्रीकृष्ण अष्टमी( गोकुळाष्टमी) मोठया उत्साहात संस्थानचे महंत श्री मधुकर शास्त्री कविश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम बालगोपाल यांचे भजन संध्या कार्यक्रम झाला त्यानंतर श्री मुर्तीस मंगल स्नान घालण्यात आले गंध अक्षता, पुष्पमाला समर्पन,विडा समर्पन, त्यानंतर महाआरती करण्यात आली. श्रीकृष्णाचा पाळणा म्हणण्यात आला. गितेचा पंधरावा अध्याय वाचन करण्यात आले.पंचश्लोक म्हणण्यात आले.

पाचही अवताराच्या जयजयकाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास शहरातील व बाहेर गावाहून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाकिांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Nanded news mahur gad krushna janmashtami

टॅग्स