माहूरगडावर श्री रेणूकादेवीची अलंकार पूजा

बालाजी कोंडे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

दरवर्षी श्री रेणूकादेवी संस्थानवर श्रावण समाप्तीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने भाविक-भक्तामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सुहासिनीचा सन्मान करून एक हजार आठ महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले.

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास समाप्तीनिमित्त श्री रेणूकादेवीची अलंकार पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली.

श्री दत्त शिखर संस्थानचे महापूरूष यांचा सन्मान संस्थानतर्फे करण्यात आल्यानंतर महापुरुषांनी महाप्रसाद घेतला. यावर्षी संस्थानने श्रावण समाप्ती महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन केले. शहरातील व्यापारी व भक्तांना तसेच तालुक्यातील नागरिकांना महाप्रसादासाठी येण्याचे आवाहण श्री रेणूकादेवी विश्वस्त समितीच्यावतीने करण्यात आले होते. हजारो भाविकांनी सहकुटूंब हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अे. डि. जहारवाल, कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विनायकराव फांदाडे, भवाणीदास भोपी, आशिष जोशी, समीर भोपी, श्रीपाद भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम, सुरक्षा व्यवस्थापक प्रकाश सरोदे उपस्थित होती.

दरवर्षी श्री रेणूकादेवी संस्थानवर श्रावण समाप्तीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने भाविक-भक्तामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सुहासिनीचा सन्मान करून एक हजार आठ महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Nanded news mahurgad renuka devi

टॅग्स