मराठा समाजाने आपसातील संवाद वाढवावा : खेडेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

जनसंवाद दौऱ्यात मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी तसेच मराठा बहुजन समाजातील अडचणींविषयी चर्चा करण्यात आली.

नवीन नांदेड : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा मराठा बहुजन जनसंवाद दौरा महाराष्ट्र भर सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून खेडेकर यांचा सिडको, नांदेड येथे (ता.१३) जून गोविंद गार्डन हडको येथे संवाद दौरा घेण्यात आला. प्रारंभी जिजाऊ पूजन करून जिजाऊ वंदनेने संवाद दौरा बैठकीची सुरवात झाली.

या जनसंवाद दौऱ्यात मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी तसेच मराठा बहुजन समाजातील अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर सखोल चर्चा करून त्यावर उपाययोजना काय करता येईल यासाठी समाजबांधवांसोबत चर्चा करून जिजाऊ सृष्टि सिंदखेडराजा येथील प्रकल्पास निधी संकलन कसा करता येईल, प्रत्येक जिल्हा पातळीवर वसतिगृहे सुरू करणे यावर सखोल असे मार्गदर्शन खेडेकर यांनी केले.

संवाद दौऱ्याचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी मांडले. सूत्रसंचालन उद्धव ढगे तर आभार साहेबराव गाडे यांनी मानले. या वेळी मराठा सेवा संघ प्रदेश अध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सरस्वती धोपटे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष सोपानराव क्षीरसागर, पंडित कदम, श्यामसुंदर शिंदे, संभाजी ब्रिगेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस सिडको हडकोतील मराठा समाजातील सर्व शेतकरी, कष्टकरी, सामाजिक, शैक्षणिक राजकीय, व्यापारी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, वकील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी कर्मचारी, अधिकारी, मराठा संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, व्ही. बी. व्ही. पी. व ईतर कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक
बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​