नांदेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेस पळविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नांदेड: एका विवाहित महिलेस तिच्या लहान मुलासह लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड: एका विवाहित महिलेस तिच्या लहान मुलासह लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील विनायकनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेस शेजारी राहणाऱ्या चेतन बालाजी बोरलेपवार, गजानन बालाजी बोरलेपवार यांच्यासह दोन महिलांनी सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. यातूनच तिचे लहान मुलासह पाच एप्रिल रोजी अपहरण केले. सर्व प्रथम पत्नीचा पतीने सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. ज्या दिवसापासून गेली तेव्हापासून त्याचे शेजारीही बेपत्ता झालेले आहेत. पत्नीला आमिष दाखवून शेजाऱ्यांनीच पळवून नेल्याची तक्रार पतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 26 मे रोजी दिली. यावरून पोलिसांनी चेतन बोरलेपवार व गजानन बोरलेपवार यांच्यासह चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश काशीद करीत आहेत.

ताज्या बातम्याः