साहेब, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पक्ष बदलाच्या चर्चेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम

नांदेडः प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्याचे लक्ष याकडे असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची प्रतिष्ठेची लढाई असली तरी सध्या कार्यकर्त्यांत मात्र गोंधळाचे वातावरण बघावयास मिळत असून, कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती सिडको-हडको परिसरात निर्माण झाली आहे.

पक्ष बदलाच्या चर्चेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम

नांदेडः प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्याचे लक्ष याकडे असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची प्रतिष्ठेची लढाई असली तरी सध्या कार्यकर्त्यांत मात्र गोंधळाचे वातावरण बघावयास मिळत असून, कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती सिडको-हडको परिसरात निर्माण झाली आहे.

प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळावे असे वाटते आहे. अनेक वर्षे खस्ता खाललेल्या कार्यकर्त्यानी केलेली अपेक्षा ही चुकीचीही नाही. 'अभी नही तो कभी नही` अशी परिस्थिती या वेळी निर्माण झाली आहे. शिवाय आपल्या वरिष्ठ नेत्यांवरही अनेकांना भरोसा राहिलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर कोण कोणत्या पक्षात प्रवेश करील याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. त्याही पलीकडे आपलाच प्रभागावर हक्क आहे, असे मनाशी ठरवून पक्ष तिकीट देओ अथवा न देवो आतापासूनच आपल्या प्रभागातील मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर केला जात आहे.अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही संभ्रमात असून योग्य दिशा देणारे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी राहावे अशी माफक अपेक्षा करीत आहेत. आतापासूनच तापत असलेल्या राजकीय वातावरणात द्विधा मनस्थितीत असलेले, राजकीय सारीपटावर चक्रव्युहात अडकलेले कार्यकर्ते, पदाधिकारी `काणता झेंडा घेऊ हाती` याचा विचार करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात अनेक राजकीय बदलाचे अनेक संकेत असल्याचे विविध माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आज आपण ज्या पक्षात आहेत, त्या पक्षातील आपला नेता नक्की आपल्यामागे राहील की नाही? याची खात्रीही कोणाला देता येत नाही. निवडणूक आली रे आली म्हटले की आपला रस्ता बदलणारे शिवाय या कुंपणावरुन लगेच दुसऱ्या कुंपणावर इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांचेही प्रमाण वाढणार आहे. ते येणाऱ्या काळात दिसणारच आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम केलेले पदाधिकारी, कार्यकर्ते तिकिटासाठी क्षणार्धात दुसऱ्या पक्षाच्या दारी गेले तर आश्चर्य वाटायला नको, असेच चित्र सध्या दिसत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण