अल्पवयीन युवतीवर अत्याचार; कन्यारत्नाला जन्म

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नांदेड: एका अल्पवयीन युवतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. यातूनच सदर युवतीने एका कन्यारत्नाला जन्म दिला. अत्याचार करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुदखेड तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील एका अल्पवयीन युवतीस आपल्या प्रेमाच्या जाळ्यात याच गावात राहणारा गंगाधर उर्फ गंग्या कैलास भारती (वय २०) ओढले. त्यातून तो तिला ठार मारण्याची धमकी देत होता. तिच्यावर सतत त्याने अत्याचार केला. यातून सदर अल्पवयीन युवती गर्भवती राहिली. तिने एका कन्यारत्नास जन्म दिला. आपली आता समाजात बदनामी झाली. सदर मुलगी वेडसर व अशिक्षीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडीत युवतीच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गंगाधर भारती विरूद्ध अत्याचार व बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एस. एस. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. खंडागळे हे करीत आहेत.