पत्नी व मेहुण्यांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

विमानतळ ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर काही दिवस त्याची पत्नी उमा ही चांगली राहिली. परंतु नंतरच्या काळात त्याला त्रास देत होती. एवढेच नाही तर तिचे भाऊ मधुकर कांबळे यांना मारहाण करून अपमानित करत. लग्नाच्या वाढदिवसाला त्याचा अपमान केला. सोलापूर येथून तो एकटाच घरी नांदेडला आला. फोनवर दोन्ही मेहुण्यांनी त्याला शिवीगाळ केली.

नांदेड : पत्नी व दोन मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून व त्यांनी केलेला अपमान सहन न झाल्याने एकाने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केली. सांगवी बुद्रुक भागातील शिवनेरीनगर येथे रविवारी (ता. २१) रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

शिवनेरीनगरमध्ये राहणारा मधुकर कांबळे यांचे लग्न सोलापूर येथे २०१० मध्ये रीती-रिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर काही दिवस त्याची पत्नी उमा ही चांगली राहिली. परंतु नंतरच्या काळात त्याला त्रास देत होती. एवढेच नाही तर तिचे भाऊ मधुकर कांबळे यांना मारहाण करून अपमानित करत. लग्नाच्या वाढदिवसाला त्याचा अपमान केला. सोलापूर येथून तो एकटाच घरी नांदेडला आला. फोनवर दोन्ही मेहुण्यांनी त्याला शिवीगाळ केली. पत्नी व मेहुण्यांच्या त्रासाला कंटाळून मधुकर कांबळे यांनी रविवारी (ता. २१) सकाळी साडेअकरा वाजता अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. यात तो ६० टक्के भाजला होता.

त्याला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा शनिवारी (ता. २७) पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या रवि अगलदिवटे, यलप्पा अगलदिवटे व उमा कांबळे हेच जबाबदार आहेत, अशी तक्रार अंबादास रामचंद्र कांबळे यांनी दिली. यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात तिघांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस नेते बाबा सिद्दिकींच्या निवासस्थानी छापे
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी 12 जूनला कर्नाटक बंद
इंदापूरजवळ अपघातात दोन जण ठार
गोवळकोट किल्ल्यावरील तोफांचे पुनर्वसन
काबूलमधील स्फोटात 80 ठार; 300 जखमी