नांदेडः कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नांदेड: सततची नापिकी व पीक कर्जाची परतफेड होत नसल्याने एका कर्जाबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना किनवट तालुक्यातील शनिवारपेठ येथे घडली.

नांदेड: सततची नापिकी व पीक कर्जाची परतफेड होत नसल्याने एका कर्जाबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना किनवट तालुक्यातील शनिवारपेठ येथे घडली.

किनवट तालुक्यातील शनिवार पेठ येथील सुरेश लक्ष्मण वागडव (वय ४०) नापिकीमुळे त्रस्त होते. त्यांनी पीककर्ज घेतले; मात्र सततची नापिकी व कर्जाची परतफेड ते वेळेवर करू शकले नाहीत. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी विष प्राशन केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी निझामबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी गंगुबाई वागडव यांच्या माहितीवरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.