विदर्भातील दुचाकी चोर विशेष पथकाच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नांदेड: विदर्भात दुचाकी चोरून माहूर व सिंदखेड परिसरात कमी दरात विक्री करणारा चोरटा विशेष पथकाच्या तावडीत सापडला. पथकाने त्याच्याकडील चोरलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सारखणी ते किनवट रस्त्यावर असलेल्या वनविभागाच्या तपासणी नाका परिसरात केली.

विशेष पथक सिंदखेड व माहूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी सारखणी वनविभागाच्या तपासणी नाका परिसरात सापळा लावला. या वेळी दत्ता सुरेश लिंगलवार (रा. सदोबा सावळी ता. आर्णी जिल्हा यवतमाळ) व सध्या गंगाजीनगर माहूर हा एक दुचाकी घेऊन एका झाडाखाली थांबला होता. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ही माहिती पुढे आली. विदर्भातून दुचाकी चोरून तो किनवट, माहूर, मांडवी, दहेली, सारखणी, वाई या भागात कमी दरात विकत असे. त्याच्यावर यवतमाळ जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात दुचाकी चोरल्याचे गुन्हे दाखल होते. चोरलेल्या चार दुचाकी दहेली येथील मोसीम तर चार दुचाकी इम्राण, गुड्डू यास दोन, छोटू यास एक अशी कबुली दिली. त्याच्याकडून एक टीव्हीएस कंपनीची, हिरोहोंडा कंपनीच्या चार अशा पाच दुचाकी जप्त केल्या. सर्व दुचाकी व चोरटा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या स्वाधीन केला.