नांदेडमधील वाहनाला अपघात; चार ठार सात जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

वर्धाः धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त नागपूर येथील दिक्षाभुमीवर महामानवास अभिवादन करण्याकरीता जाणाऱया नांदेड जिल्यातील क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये अरविंद मारोती खंडारे (वय ३३), दिलीप संभाजी खंडारे (३५), शिवाजी शंकर ढगे (३८), विठ्ठल खडसे (४२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. साहिल खडसे, मिलींद खडसे, श्री. पाटील, जाणबा शिंदे, हणुमंत कदम, तेजस खंडारे, शिवाजी कदम हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रव्हलस आणि क्रुझर यांच्यात शुक्रवारी (ता. २९) सेलसुरा गावाजवळ अपघात झाला. अपघात येवढा भीषण होता की यात कृझर गाडीच्या दर्शनीय भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

नागपूरकडे जात असताना सालोड व सेलसुरा गावाजवळ वाहन क्रमांक एम. एच. २६, ६०३१ या वाहनाला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱया एम. एच. ४० एन. ०७०७ क्रमांकाच्या ट्रव्हलसने ओव्हरटेक करण्याच्या नादात क्रुझरला जोरदार धडक दिली. यात क्रुझर गाड़ी फेकल्या गेली. यामधील चार प्रवासी ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ट्रव्हलचा चालक लियाकत खान सरवर खान (वय ६०, रा. अशोकनगर नागपूर) याच्या विरुद्ध सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सावंगी पोलिस करत आहेत.

Web Title: nanded news vehicle accident; Four killed, seven injured