चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळून मारणाऱयास दहा वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कंधार (नांदेड): चारित्र्यावर संशय घेवून तसेच दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून मारणाऱ्या आरोपी संतोष हौसाजी सोनकांबळे (रा. निपानी सावरगाव, ता. कंधार) यास कंधारचे जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी मंगळवारी (ता. चार) दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

निपाणी सावरगाव (ता. कंधार) येथे ता. 30 जुलै 2014 रोजी ही घटना घडली होती. आरोपी संतोष आपली पत्नी मीनाबाई यांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. मारहाणही करायचा. ता. 30 जुलै 2014 रोजी पत्नीला पैसे मागितले, पत्नीने पैसे दिले नाही, यामुळे त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून टाकले. मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबावरून आरोपी संतोष सोनकांबळे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपीविरुद्ध ता. 29 ऑक्‍टोबर 2014 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणातील मयत मीनाबाई सोनकांबळे यांनी मृत्यूपूर्व दिलेले जबाब ग्राह्य मानून न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी आरोपी संतोष सोनकांबळे याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारची बाजू अतिरिक्त सरकारी वकील निरज कोळनुरकर यांनी मांडली. त्यांना पोलिस शिपाई क्षीरसागर, केंद्रे, तरटे यांनी सहकार्य केले.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017