नांदेडः स्त्री रुग्णालयात गरोदर मातांची उपेक्षा

file photo
file photo

उपचारासाठी माराव्या लागतात चकरा; जिल्हा शल्यचित्सकाचे रुग्णालयाकडे दुर्लक्ष

नांदेडः श्यामनगर येथील स्त्री रुग्णालया हे गरोदर माता आणि बालकांची काळजी घेणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. सर्व सोई सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या स्त्री रुग्णालयाने काही वर्षातच नांदेड जिल्ह्यासह वसमत, कळमनुरी, औंढा, या सह आजू बाजूच्या तालुक्यातील गरोदर मातेसाठी रुग्णालय वरदान ठरत असल्याचे मानले जात होते. परंतू सध्या रुग्णालयाची परिस्थिती पहाता गरोदर मातेसाठी वरदान ठरणाऱ्या रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी गरोदर मातांना अनेकदा खेटे खाऊन देखील वेळेवर उपचार मिळत नसल्याचे दिसून येते आहे.

या विषयी 'सकाळ'च्या टिमने रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांनशी संवाद साधला असता अनेक गरोदर मातांनी रुग्णालयाकडून होणाऱ्या उपचारा बद्दल हलगर्जीपणा विषयी नाराजी सकाळ कडे नाराजी व्यक्त करताना आप बिती सागितली ती अशी- वसमत तालुक्यातील पळसगाव येथुन आलेल्या मंगल काकडे ही गरोदर माता तीन दिवसापासून रुग्णालयात दाखल झाली होती. पोटातील पाणी कमी असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना विष्णुपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सल्यानुसार ते विष्णुपुरी येथे गेले असता तेथील डॉक्टरांनकडून पोटात दुखल तरच या अन्यथा येऊनका म्हणून काढुन दिले. नंतर त्या गरोदर मातेला घेऊन घरचे पुन्हा श्यामनगर स्त्री रुग्णालयात आले असता त्यांनी गरोदर मातेच्या नातलगलांना विश्वासात न घेताच तुमच्या बाळाची गॅरंटी देणार नाही म्हणून गरोदर मातेलाच सागितले. त्यामुळे गरोदर मातेचा रक्तदाब वाढला. व नातेवाईकांनी नेमके कोणता निर्णय घ्यावा, काय करावे काहीच खळत नव्हते.

कहाळा येथून उपचारा करिता आलेल्या मोरे कुटुंबातील एक महिलेची सोनोग्राफी केली असता आम्हाला काहीच कळत नाही. तुम्ही विष्णुपुरीच्या रुग्णालयात जा नाही तर दुसऱ्या रुग्णालयात जा असा सल्ला देण्यात आला. कोसो दुर वरुन गरोदर मातेला घेऊन आलेल्या या महिलेच्या कुटुंबातील सर्वजन अशिक्षित होते. काय करावे कुठे जावे त्यांना काहीच सुचत नव्हते. अशा विपरीत परिस्थितीत स्त्री रुग्णालयातील वरिष्ठ "डॉक्टर देखील रुग्णालयात हजर नव्हते. त्यामुळे गरोदर मातेस व कुटुंबास त्यांची वाट'पहात बसण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. असे अनेक गरोदर मातांना उपचारा विनाच ताटकाळात बसावे लागत आहे. त्यातच रुग्णालयाच्या मुख्य दरवाज्यावर असलेल्या दोन गार्ड महिला ह्या अनोळखी पुरुषांनाच आत सोडत नाहीत. परंतू जवळचा ओळखीचा कुणी पुरुष दिसला की त्यांना कर्मचारी म्हणून त्या महिलेसोबत आत जाण्याची परवानगी देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com