नांदेडच्या स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांचा गरोदर मातेच्या जिवाशी खेळ

file photo
file photo

चक्क रक्तगट बदलला; आम्ही जे सांगतो तोच रक्त गट खरा म्हणत गरोदर मातेची डॉक्टराकडून दमकोंडी

नांदेडः सरकारच्या निकषांनुसार गरोदर मातेला बाळ पोटात आसल्याच्या पहिल्या महिण्यापासूनच रक्त, रक्तातील साखरेचे प्रमाण, एचआयव्ही, टेस्ट', लघवी, ब्लड प्रेशरची तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. व त्या नंतर गरोदर मातेस बाळ जन्माला येईपर्यंत तपासणीकरुन मोफत औषधोपचारा पुरविले जातात. असे असले तरी गरोदर मातांवर शासन मोफत औषधोपचार करतय म्हणून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनकडून बाल मातांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात तपासणी साठी आलेल्या एका गरोदर मातेच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्या सोबतच रक्तगटाची ही तपासणी करण्यात आली खरी; परंतू रक्ताची तपासणी करणाऱ्या डॉक्टरनी चक्क गरोदर मातेचा रक्तगटच बदलुन टाकला. आणि आम्ही जो रक्तगट दिला तोच खरा आहे म्हणत त्या रगोदर मातेस दम दिली असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे.

मंगळावारी (ता.नऊ) मे रोजी प्रिती सावते नावाची महिला आपल्या पती सोबत श्यामनगरच्या स्त्री रुग्णालयात तपासणी करत गेली होती. त्यांच्या जन्मापासून त्यांचा रक्तगट हा ‘ओ’`(o) पॉझिटिव्ह आहे. असे असतांना देखील त्यांनी नियमा प्रमाणे गरोदरपणात महत्वाच्या असणाऱ्या सर्व तपासण्या करुन घेण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यांच्या ‘ओ’`पॉझीटीव्ह या मुळ रक्तगटा एेवजी ‘बी’(B) पॉझिटीव्ह रक्तगट केस पेपरवर नमुद केल्याचे त्यांना अश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रक्तगटाची खातरी करुन घेण्यासाठी खासगी पॉथाॅलाॅजी मध्ये जाऊन रक्तगट'चेक केला असता त्यांचा रिपोर्ट' देखील ‘ओ’`पॉझिटिव आला. त्या नंतर तेथील मुख्य डॉक्टरांना भेटुन वरिल घटनेची कल्पनाही दिली. परंतू इथेही त्यांची निराशाच झाली.वरिष्ठ"डॉक्टरांनी त्यांचे म्हणने एेकुन घेण्या एेवजी उलट'त्यांची दमदाटी केली. आमचा जो रिपोर्ट आहे तोच खरा म्हणत रक्तगट'तपासणी करणाऱ्या डॉक्टरांची पाठीराखन केली.

मी स्वतः डी.एम.एल.टी कोर्स केला आहे. त्यामुळे मला रक्तगट तपासणी बद्दल बऱ्याच गोष्टी माहित आहेत.वरिष्ठ"डॉक्टरांनी माझे म्हणने एेकुन घेण्या एवजी हजार रुग्णामागे एखाद्याच रुग्णाच्या बबतील असा एधादा प्रकार घडतो. पुन्हा रक्ताची तपासणी करुन घ्या. नाहीतर तुमच्याकडून काय होतय ते करा असे सागण्यात आले. एक जिम्मेदार डॉक्टर असे बोलत असेल तर गरोदर मातांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर.
- प्रिती सावते (गरोदरमाता)
 

चुकीच्या गटाचे रक्त दिल्यास रुग्ण दगावू शकतो
‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाला ‘ए निगेटिव्ह’ गटाचे रक्त चालू शकते. किंवा ‘ओ’`निगेटीव्ह हा रक्तगट'कुणालाही चालु शकतो. परंतू एखाद्या व्यक्तीस चुकीच्या रक्तगटाचे १० एमएल रक्तही रुग्णाला दिल्यास तो दगावू शकतो. अशा रुग्णास जॉनडीश, अनेमिया, तमा लागुन तो रुग्ण दगावू शकतो. म्हणून रक्तगटाची खात्री करन घेणे गरजेचे असते.
- डॉ. काननबाला येळीकर (अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड.)

 श्यामनगर स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय आधिक्षक डॉ. श्री संगेवार हे सध्या रजेवर आहेत. त्यांचा पदभार तात्पुर्ता दुसऱ्या डॉक्टरावर सोपविण्यात आला आहे. परंतू या प्रकरणा संदर्भात आपल्याकडे कुठलीही लेखी तक्रार आली नाही. तक्रार आल्यास घडलेल्या प्रकणाची शहा निशा करुन कामात निष्काळजी करणाऱ्या डॉक्टरान विरोधात पुरावे गोळा करुन उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांच्या कडे कारवाईसाठी पाठविण्यात येतील.
- डॉ. बाबाराव कदम (जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com