राष्ट्रवादीत आमदार क्षीरसागरांनाच पुढचे स्थान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

बीड - झेडपी अध्यक्ष निवडीनंतर "पक्षद्रोह' करणाऱ्यांवर कारवाई करणार, असे खुद्द अजित पवारांनी स्पष्ट केल्याने तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि जणू आगामी विधानसभेची उमेदवारी आपल्याच नेत्याला असे वाटणाऱ्या आघाडीच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण, विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत पक्षाकडून प्रमुख नेत्यांमधून जयदत्त क्षीरसागर सहभागी झाल्याने आजही पक्षात त्यांनाच मानाचे स्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पालिका निवडणुकीपासून बीडमध्ये क्षीरसागरांच्या घरात "काका - पुतण्या' वाद सुरू झाला. संदीप क्षीरसागरांनी दोन्ही काकांच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सुरू केले. वास्तविक या वादाला पक्षातील काही नेत्यांकडून खतपाणी असल्याचे लपून राहिले नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाशी बंडखोरी करणारे निवडणुकीनंतर पक्षासोबत नसतील, असे जाहीर सांगितले असतानाही पंचायत समितीचा पक्षादेश आणि क्षीरसागरांच्या विरोधानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी आघाडीला सोबत घेतले. यावरून आमदार क्षीरसागरांना "शह' देण्याच्या खेळीत पक्षातील वरिष्ठांचाही सहभाग असल्याचे लपून राहिले नाही. त्यातच झेडपीसाठी साथ घेताना "विधानसभेला आपणच' असा शब्दही दिल्याची माहिती आहे. दरम्यान, अध्यक्ष निवडीवेळी सुरेश धस आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर कारवाईची मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी केली. खुद्द अजित पवारांनीही आपल्या फेसबुकवर 

"पक्षद्रोह' करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विधानसभेची उमेदवारी आपल्याच नेत्याला मिळणार अशा पोस्ट संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर फिरवल्या. पण, दहा दिवस उलटले, तरी पक्षाकडून कारवाई तर नाहीच, उलट विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेत राष्ट्रवादीने प्रमुख नेत्यांमधून क्षीरसागरांना सहभागी केले केले. त्यामुळे आघाडीच्या गोटात पुन्हा अस्वस्थता वाढली आहे. 

Web Title: NCP MLA ksirasagar