मुंबईत भाजपला मदत करणार नाही- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सरकार पडले तर मध्यावती निवडणुका 
महापालिका अाणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरही भाजप - शिवसेनेने एकमेकांवर टिका करत असल्याने हे सरकार टिकेल की नाही, यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

नांदेड : मुंबई महापालिकेत कॉंग्रेस अाणि राष्ट्रवादीची संख्या मर्यादीत अाहे. मुंबईमध्ये महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी (ता. २६) नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण भाजप वगळता शिवसेनेला मदत करायची की नाही याबाबत येत्या तीन तारखेला राष्ट्रवादीची बैठक होईल आणि त्यात निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने श्री. पवार यांनी डी. लीट. पदवी रविवारी प्रदान करण्यात आली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी जास्त लाेकांची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेला फारसे अवघड नसल्याचे सूचक विधानही त्यांनी केले अाहे. महापालिकेतील नेते माणसे फोडण्यात पटाईत असल्याने मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी फारशी अडचण येण्याची शक्यता नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

अाघाडीबाबत मी स्वतः अनुकूल 
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबत काँग्रेस कडून प्रस्ताव आला आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तर राज्यात अठरा ते एकोणीस ठिकाणी सत्ता स्थापन होऊ शकते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि आघाडी करण्याबाबत मी स्वतः अनुकूल असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले. याबाबतचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

राष्ट्रवादी क्रमांक दाेनवर 
महापालिका अाणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना श्री. पवार म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शहरात अामची संख्या काही सुधारली नाही मात्र ग्रामीण भागात भाजपानंतर राष्ट्रवादीचा दुसरा क्रमांक आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस अाणि चौथ्यावर शिवसेना गेली अाहे. राष्ट्रवादीची सद्यस्थिती ही ग्रामीण भागात चांगली असल्याने चिंतेचे कारण नाही पण शहरी भागातील मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारले याबाबत विचारमंथन करावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले. 

सरकार पडले तर मध्यावती निवडणुका 
महापालिका अाणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरही भाजप - शिवसेनेने एकमेकांवर टिका करत असल्याने हे सरकार टिकेल की नाही, यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी मागे सत्तेतून बाहेर पडण्याचे वक्तव्य केले हाेते. सध्या तसे तर काही दिसत नाही. त्याचबरोबर अामचं तर संख्याबळ नाही त्याचबरोबर अाम्ही शिवसेना किंवा भाजपाला पाठींबा देऊ शकत नाहीत अाणि त्यांचा पाठींबा घेऊ शकत नाही. सरकार पडण्याची शक्यता नसल्याचे मत मांडत असतानाच मात्र सरकार पडले तर निवडणुकांना सामाेरे जावे लागेल, असेही श्री. पवार म्हणाले. 

मराठवाडा

पोटाची खळगी भरण्यासाठी लाखो कुटुंबांची शहरांकडे धाव औरंगाबाद - खरीप...

05.51 AM

उस्मानाबाद - गरिबीला कंटाळून बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील देवकन्या रमेश तानवडे (...

05.15 AM

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017