'नीट' परीक्षा केंद्र जिल्हास्तरावर द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

गणेश चौगुलेंनी मांडली भूमिका; राज्यात सहाच केंद्रे
नांदेड - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या "नीट' परीक्षेसाठी राज्यात केवळ सहाच केंद्रे आहेत. ती वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुळात लाखो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जिल्हानिहाय केंद्रे वाढवावीत, अशी भूमिका प्रा. गणेश चौगुले यांनी मांडली आहे.

यावर्षी सात मे रोजी "नीट' परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी देशात 84 केंद्रे आहेत. त्यात महाराष्ट्रात केवळ सहा केंद्रे आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी अशा सर्व घटकांनी महाराष्ट्रात केंद्र वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी प्रा. चौगुले यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच वेळी मनुष्यबळ विकासमंत्र्यांसह सर्व स्तरावर पाठपुरावाही केला.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा केवळ सहा ठिकाणी परीक्षेला जाणे ग्रामीण विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. यावर्षी सुमारे सहा लाख विद्यार्थी परीक्षा देतील. गेल्यावर्षी झालेल्या "सीईटी'साठी चार लाख 92 हजार 76 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. यावर्षीची संख्या तर सहा लाखांवर असल्याने गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांचे हाल होतील. परीक्षेचा अभ्यास, प्रवास, आर्थिक भुर्दंड, ताण आदी बाबींकडे प्रा. चौगुले यांनी लक्ष वेधले. सरकार, सीबीएसई, एमसीआय पातळीवर प्रा. चौगुले यांनी प्रयत्न केले. सरकारचा आजवरचा प्रयत्न अपुरा आहे. विद्यार्थ्यांची अडचण समूळ दूर होत नाही. त्यामुळे केंद्रे जिल्हानिहाय वाढविलीच पाहिजेत, अशी भूमिका प्रा. चौगुले यांनी मांडली आहे.

Web Title: neet exam center district lavel