वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण

नांदेड - जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी विभागीय स्नेहमेळाव्यात बोलताना खासदार अशोक चव्हाण. यावेळी डी. पी. सावंत, हरिशचंद्र पवार, सुनील पाटणकर, महापौर शीला भवरे, किशोर भवरे,
नांदेड - जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी विभागीय स्नेहमेळाव्यात बोलताना खासदार अशोक चव्हाण. यावेळी डी. पी. सावंत, हरिशचंद्र पवार, सुनील पाटणकर, महापौर शीला भवरे, किशोर भवरे,

नांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही. विक्रेता हा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या हातात सरकार खेचण्याची ताकद असते. आगामी काळात आपल्याला हे सरकार खेचायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काँग्रेसच्या सोबत राहावे. पक्षाची सत्ता आल्यास विक्रेत्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.

नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सोमवारी (ता. १५) येथे विभागीय स्नेहमेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्तच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. आमदार डी. पी. सावंत, महापौर शीला भवरे, महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार आदी उपस्थित होते.

खासदार चव्हाण म्हणाले, ‘बारा वर्षांपूर्वी वृत्तपत्र विक्रेता संघटनेने मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज थेट बारा वर्षांनी मला कार्यक्रमाला बोलावले आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना विक्रेत्यांनी मागण्यांचे स्मरण करून दिले असते, तर आजपर्यंत हा प्रश्नच राहिला नसता. सध्या सत्तेत नसल्याने मागण्या पूर्ण करता येत नसल्या, तरी मी आमच्या विरोधी पक्षनेत्यांना सांगून या प्रश्नाचा पाठपुरावा करायला सांगेन.

आज अनेक वृत्तपत्रांनी या घटकाच्या प्रश्नांची दखल घेतली आहे. ती निश्‍चितच वाखाणण्याजोगी आहे. पुढील काळात या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे’. नांदेड महापालिकेमार्फत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शेडची उभारणी, स्टॉलसाठी जागा निश्‍चिती व घरकुल योजनेसाठी महापौरांनी विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी महापौर शीला भवरे यांना केली.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, शंतनू डोईफोडे, शिवगोंडा खोत, गोरख भिल्लारे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रकाश कांबळे, सचिव विजय जोशी, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक दयानंद माने, पेपर किंगचे सीईओ निरंजन तिवारी यांच्यासह महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यातील सर्व उपाध्यक्ष तथा संघटन सचिव उपस्थित होते. बालाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. अशोक ठावरे यांनी सूत्रसंचालन केले.

ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार
वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता जगन्नाथ व्यवहारे, प्रदीप नागापूरकर, रूपेश पाडमुख व श्रीमती वंदना लोणे यांचा खासदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सायकल स्पर्धेतील पहिल्या दोन विजेत्यांना सायकली भेट देण्यात आल्या; तर तृतीय विजेत्यास एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com