रेल्वे लूटप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

परभणी - नरसापूर एक्‍स्प्रेस रेल्वे लूटप्रकरणी सोमवारी (ता.15) रात्री उशिरापर्यंत नांदेड रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. अद्याप पोलिस चोरट्यांच्या मागावर असून ते हाती लागलेले नाहीत.

परभणी - नरसापूर एक्‍स्प्रेस रेल्वे लूटप्रकरणी सोमवारी (ता.15) रात्री उशिरापर्यंत नांदेड रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. अद्याप पोलिस चोरट्यांच्या मागावर असून ते हाती लागलेले नाहीत.

नरसापूर - नगरसोल ही एक्‍स्प्रेस रेल्वे रविवारी (ता. 14) परभणीहून निघाली होती. पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरट्यांनी पेडगाव (ता.परभणी) ते देवळगाव अवचार (ता.सेलू) या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड करीत ही एक्‍स्प्रेस रेल्वे थांबवली. त्यानंतर प्रवाशांना धाक दाखवत काही प्रवाशांना लूटले आणि तेथून ते पसार झाले होते. ते आज सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. परभणीला पोलिस ठाणे नसल्याने नांदेड अंतर्गत परभणी आहे. सायंकाळी सातपर्यंत नांदेड पोलिसांतही गुन्हा दाखल झाला नसल्याचे फौजदार अमित उपाध्याय यांनी सांगितले.

Web Title: no crime registration railway loot