एटीएममधून  निघू लागले पैसे!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - आठवडाभरापासून शहरातील एटीएममध्ये पैशांचा तुटवडा होता. यामुळे नागरिकांना पैसे न मिळाल्यामुळे रोखीच्या व्यवहारावर मोठा परिणाम दिसून आला. याविषयी आवाज उठविल्यानंतर बुधवारी (ता.१८) शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैसे जमा करण्यात आले होते. यामुळे अक्षयतृतीयेला नागरिकांना पैसे उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

शहरातील मुख्य बाजारपेठ, सिडको-हडको व इतर परिसरातील प्रमुख बॅंकांच्या एटीएमवर गेल्या काही दिवसांपासून ‘नो कॅश’चा बोर्ड झळकत होता. आठवडाभरापासून ही समस्या असल्याने नागरिक हैराण झाले. सोमवारी (ता.१६) हडको-टीव्ही सेंटर परिसरातील सर्वच एटीएम बंद होते. एका ठिकाणी असलेल्या एटीएमवर लोकांनी रांगा लावून पैसे काढले. मंगळवारी पुन्हा शहरातील संपूर्ण एटीएमवरील पैसे संपले होते. नोटाबंदीनंतर आणि दिवाळीच्या काळात पैसे काढण्यासाठी दिसणारी रांग सोमवारी व मंगळवारी काही ठिकाणी पुन्हा दिसून आली. देशभरात अनेक राज्यांत रोकडची चणचण निर्माण झाल्याच्या तक्रारी भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे आल्या आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारास सरकारतर्फे प्राधान्य देत असले, तरी नगदी रोकडशिवाय कामे होत नाहीत. यामुळे काही व्यवहारांसाठी नगदीची आवश्‍यकता असते. एटीएमविषयी ओरड झाल्यानंतर बॅंकांनी एटीएममध्ये कॅशची सुविधा उपलब्ध करून दिली; मात्र अद्यापही शहरातील काही एटीएमवर पैसे येणे बाकी आहेत.

Web Title: No shortage in ATM

टॅग्स