औरंगाबाद शहरात सात दिवसांपासून ठणठणाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - पावसाळा तोंडावर आला असला तरी शहरात पाण्यासाठी उद्रेक सुरूच असून, सोमवारी एमआयएम नगरसेवकांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर उपोषण केले; तर भाजप नगरसेविकेने राजीनामा अस्त्र उपसले. महापौरांनी नगरसेवकांची समजूत काढत रात्री उशिरा बैठकीचे आयोजन केले असून, पदाधिकाऱ्यांना माहिती न देता मुंबईला गेलेले कार्यकारी अभियंता सरताचसिंग चहेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांचा टाहो सुरू आहे. अनेक भागांत नळाला सहा-सात दिवसांनंतरही पाणी येत नसल्याने पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलने केली जात आहेत. जुन्या शहरात सोमवारी सातव्या दिवशीही पाणी न आल्याने एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी, जमीर कादरी; तसेच डॉ. अफजल खान, आरेफ हुसेनी, सईद फारुकी यांच्यासह संतप्त नागरिक सकाळी साडेदहा वाजता शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर जमा झाले. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर दुपारी महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रमजानचा महिना सुरू असताना सात दिवस पाणी मिळत नसेल, तर अधिकारी काय करतात, असा प्रश्‍न नागरिक, नगरसेवकांनी महापौरांना केला. 

Web Title: no water in aurangabad city