नोटाबंदीचा निर्णय पुढील काळासाठी उपयोगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

लातूर - काळ्या पैशाला धक्का देण्याची चर्चा केली जायची; पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. नोटाबंदीचा त्यांचा निर्णय ऐतिहासिक व धाडसी आहे. सध्याच्या गैरसोयीचा अपवाद सोडला तर पुढील काळात उपयोगी आहे, असा विश्‍वास प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला. 

लातूर - काळ्या पैशाला धक्का देण्याची चर्चा केली जायची; पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. नोटाबंदीचा त्यांचा निर्णय ऐतिहासिक व धाडसी आहे. सध्याच्या गैरसोयीचा अपवाद सोडला तर पुढील काळात उपयोगी आहे, असा विश्‍वास प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला. 

येथील श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (ता. 15) आयोजित "विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक उद्योजक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे व धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. जाधव पुढे म्हणाले, ""नोटा बंदीपूर्वी भारताची अर्थव्यवस्था वेगवान होती. विकासाचा दर साडेसात टक्के होता. याचा अर्थ सर्व काही आलबेल होते, असे नाही. नोटाबंदीमुळे झालेल्या गैरसोयीची चर्चा होते; मात्र दीर्घकालीन उपयुक्ततेबद्दल बोलले जात नाही. प्रसारमाध्यमांनी गैरसमज वाढवून सांगितला; पण उपयुक्तता सांगितली नाही.'' 

माजी पंतप्रधान तथा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग माझे गुरू आहेत; परंतु त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात राज्यसभेत जे भाषण केले ते राजकीय स्वरूपाचे असल्याचे सांगून अर्थतज्ज्ञ, विविध पक्षांच्या नेत्यांनी या नोटाबंदीच्या निर्णयावर केलेली टीका- टिप्पणी, तसेच आरोप डॉ. जाधव यांनी खोडून काढले. नोटाबंदीचा निर्णय पूर्वतयारी करून घेता येत नाही. पूर्वतयारीसाठी वेळ जातो आणि गुप्तता राहत नाही, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. डॉ. कुंभार यांचे अध्यक्षीय भाषण केले. श्री. ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश बेळंबे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी आभार मानले.

मराठवाडा

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत 14 वर्षांच्या मुलीची वेणी कापल्याची...

12.12 AM

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा हिंगोलीः जिल्हयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017