‘‘न्याय आपल्या दारी’’; मोबाईल वाहनाचे उद्घाटन

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 5 जून 2018

नांदेड :  समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुधीर कुलकर्णी आणि न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी केले. 

कायदेविषयक शिबीराचे आयोजन नांदेड जिल्ह्यात 5 जून ते 30 जून या कालावधीत करण्यात आले आहे. 

मंगळवारी (ता. 5) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधिश एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव डी. टी. वसावे, जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. तसेच फिरते लोक न्यायालयाचे पॅनल प्रमुख सेवानिवृत्त न्यायाधिश भिमराव नरवाडे,  अॅड. प्रविण अयाचित यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: nyay aaplya dari mobile vehicle inauguration