सेलूत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सेलूत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सेलू : शहरातील हेमंतनगर येथील रहिवाशी असलेल्या एका इसमाने गुरूवारी (ता.२०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सेलू पोलिसांत झाली अाहे.

शहरातील हेमंतनगर येथील रहिवाशी विष्णू रावसाहेब घांडगे (वय-55) यांनी आपल्या राहत्या घरातील पत्राच्या खालच्या लोखंडी पाईपला सायकलच्या रबरी ट्यूबच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.२१) रोजी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना सदरील घटना समजली. डिंगाबर विष्णु घांडगे यांनी पोलिस ठाणे सेलू येथे माहिती देऊन सदरील घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संजय साळवे हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com