श्री विसर्जनासोबत एकाचा बुडून मृत्यू; बिलोली तालुक्यातील घटना

One died because of drowning in Biloli taluka
One died because of drowning in Biloli taluka

बिलोली : श्री विसर्जनावेळी नदी पात्रात उतरलेल्या एका गणेशभक्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी मांजरा नदी पात्रात घडली. गंगाधर पिराजी बरबडे (वय २२) असे मयत गणेशभक्ताचे नाव आहे. 

बिलोली तालुक्यात सर्वत्र ‘श्री' चे विसर्जन अतिशय शांततेत पार पडत होते. परंतु सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिलोली येथील काही तरूण गणेश विसर्जनासाठी मांजरा नदीवर गेले होते. गणेश विसर्जनानंतर त्यातील गंगाधर बरबडे हा पोहण्यासाठी नदी पात्रात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बिलोलीचे पोलिस निरिक्षक भगवान धबडगे, उपनिरिक्षक श्री पंतोजी, नगरसेवक अमजद चाऊस आदीं घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे बिलोलीतील गणेश विसर्जनावर शोककळा पसरली होती. रात्री उशिरा पोलिसांनी पिराबाई बरबडे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सोमवारी (ता. २४) मयत तरूणाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. बोधणे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com