चिखलठाण शिवारात 32 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

संजय जाधव
बुधवार, 23 मे 2018

चिखलठाण शिवारात 32 वर्षीय इसमाचा इनाम शेतात मृतदेह आढळून आला.

कन्नड - तालुक्यातील चिखलठाण शिवारात बजारसावंगी रस्त्यालगत बुधवारी (ता. 23) सकाळी एका 32 वर्षीय इसमाचा इनाम शेतात मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती पोलिस पाटील अरविंद धनेधर यांनी कळवली आहे. कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रोहित बेंबरे घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

विजय शिवलाल राठोड (32 वर्षे) रा. घुसून तांडा मायताचे नाव असून प्रेता शेजारी दगड मिळून आल्याने खून झाल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Man Dead Body Found at Kannad village