एका बैठकीत सगळे प्रश्न सुटणार नाहीत:मुख्यमंत्री

निरंजन छानवाल : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आज (मंगळवार) मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका बैठकीत सगळे प्रश्न सुटणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे-

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आज (मंगळवार) मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका बैठकीत सगळे प्रश्न सुटणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे-

 • सिंचनासाठी 9291 कोटी रूपयांची तरतूद, 4 वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार.
 • सोमवारच्या पावसाने 15 लाख हेक्टर पिकाचं नुकसान, 78 टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला.
 • 5326 कोटी रूपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता, मार्च 2019 पर्यंत बीडला रेल्वे जाईल असे नियोजन.
 • 2300 किमीचे राज्य रस्ते, 2200 किमीचे राष्ट्रीय महामार्ग पुढच्या 3 वर्षात, 30,000 कोटी रूपये केंद्र व राज्य मिळून देणार.
 • औरंगाबाद धावपट्टीच्या विस्तारीकरणाला मान्यता.
 • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मराठवाड्यात 1 लाख घरे बांधणार.
 • जालना व लातूर येथील तंत्रनिकेतन हे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतरित करणार.
 • मार्च 2019 पर्यंत परळी-बीड रेल्वे मार्ग सुरु करणार.
 • नागपूर-मुंबई एक्सप्रेस-वे मुळे मराठवाडयाला लाभ.
 • जमीन खरडून गेली त्यांनाही मदत करणार.
 • नांदेड विमानसेवा सुरू करणार.
 • जालना येथे सीड पार्क होणार, यासाठी 930 कोटींची तरतूद.
 • औरंगाबादमध्ये जलसंधारण आयुक्तालय होणार.
 • औरंगाबाद येथे 85 एकर सरकारी जमीन प्राणी संग्राहालयासाठी देणार.
 • औरंगाबादेत कॅन्सर संस्थेला राज्य संस्थेचा दर्जा देणार, यासाठी 120 कोटी रुपये निधी देणार.
 • औरंगाबाद शहर स्मार्ट सिटीत समावेश. भौतिक सुविधेसाठी 1000 कोटी देणार. 250 कोटी रुपये मनपाच्या हिश्याचे राज्य सरकार देणार.
 • हिंगोलीत 10 हजार वैयक्तीक विहीरी घेणार. 3 वर्षांत साडेचार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.
 • लातुरला विभागीय क्रीडा संकुलला मान्यता.
 • औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी 10 कोटी रुपये व सात एकर जमीन देणार.
 • करोडीला ट्रान्सपोर्ट हब. औरंगाबादला एमएसआरडीसी तयार करणार.
Web Title: One meeting won't solve all the questions of Marathwada, says Devendra Fadnavis