धान्य घोटाळ्यातील एकाचा गुन्हा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

औरंगाबाद - परभणी येथील शासकीय धान्य घोटाळ्याच्या प्रकरणात शेख मुस्तफा शेख मोहीउद्दिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी रद्द केला.

बनवस (ता. पालम, जि. परभणी) येथील तीन स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात नायब तहसीलदार अनंत देशपांडे यांच्या तक्रारीवरून जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या दुकानदारांनी सप्टेंबर 2015 मध्ये तहसील कार्यालयातून नियमाप्रमाणे धान्याची उचल केली; मात्र धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप न करता त्याचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याच गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपासादरम्यान शेख मुस्ताक यांना आरोपी केले होते. त्याविरोधात शेख मुश्‍ताक यांनी ऍड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे ऍड. प्रीती डिग्गीकर यांनी काम पाहिले.

Web Title: one people grain scam crime cancel