बंद सभागृहात सुनावणीस विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

औरंगाबाद - समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे चित्र शनिवारी पहायला मिळाले. बंद सभागृहात या मार्गासंबंधीची पर्यावरण विषयक जनसुनावणी बेकायदा असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जनसुनावणी सोडून सभागृहाबाहेर पडणे पसंत केले.

औरंगाबादच्या सिडको नाट्यगृहात समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची पर्यावरण विषयक सुनावणी आज होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही सुनावणी बेकायदा असल्याचे सांगत बंद सभागृहात सुनावणी न घेता प्रत्यक्ष गावात जाऊन सुनावणी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या प्रकल्पात हजारो झाड, जनावर आणि माणस उद्‌ध्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांच्या कमाईचे साधन हिरावून घेतले जात असल्याने हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी करत शेतकरी सभागृहातून निघून केले. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा विश्वास या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला.