ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश हंबिरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

उस्मानाबाद - येथील ज्येष्ठ पत्रकार, माजी नगरसेवक व्यंकटेश अंबादासराव हंबिरे (वय 75) यांचे सोमवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. सहा) सकाळी साडेदहा वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्यंकटेश हंबिरे यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, उस्मानाबादचे नगरसेवक, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहिले आहे. केशेगाव (ता. उस्मानाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. (कै.) हंबिरे यांनी शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामध्ये रेल्वेसाठीचे आंदोलन, डी.फार्मसी.साठीचे आंदोलन, जिल्हा क्रीडा संकुलासाठीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. काही आंदोलनांत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सहित्यिक, शैक्षणिक, पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. राष्ट्रसेवादलाचे ते क्रियाशील सदस्य होते. एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, पन्नालाल सुराणा यांचे ते निकटवर्तीय सहकारी होते. मंगळवारी सकाळी दहा वाजता गवळी गल्लीतून त्यांच्या "अक्षरसदन' या निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरवात होणार आहे.

मराठवाडा

औरंगाबाद  : यंदा वेळेवर व भरपूर पाऊस पडणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी वेळीच मशागत केली होती....

10.09 AM

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन...

09.48 AM

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM