उस्मानाबाद: तेरणा नदी सात वर्षांनी भरुन वाहू लागली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

2010 मध्ये जून महिन्यात मृग नक्षञाच्या पूर्वार्धात कळंब तालुक्यातील येरमाळा, तेरखेडा गौर, वाघोली, दहीफळ या परिसरात व उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, कसबे तडवळे, जवळा दुमाला, दुधगाव खामगाव या परीसरात जोरदार पाऊस पडला होता त्यावेळी तेरणा नदी तुडंब भरुन वाहिली होती. त्यानंतर सात वर्षांनी नदी भरून वाहू लागली आहे. 

कसबे तडवळे - गेल्या सात वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी जूनमध्ये मृग नक्षञात पहिल्यांदाच दमदार पाउस पडल्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यामधून वाहणारी तेरणा नदी भरुन वाहू लागली.

2010 मध्ये जून महिन्यात मृग नक्षञाच्या पूर्वार्धात कळंब तालुक्यातील येरमाळा, तेरखेडा गौर, वाघोली, दहीफळ या परिसरात व उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, कसबे तडवळे, जवळा दुमाला, दुधगाव खामगाव या परीसरात जोरदार पाऊस पडला होता त्यावेळी तेरणा नदी तुडंब भरुन वाहिली होती. त्यानंतर सात वर्षांनी नदी भरून वाहू लागली आहे. 

गेल्या सात वर्षाच्या काळात दरवर्षी पावसाला विलंबच होत गेला. एखाद्या वर्षी मृग नक्षत्र संपल्यावर पावसाला सुरवात होत होती. तर एखाद्या वर्षी आर्द्रा नक्षञ संपल्यावर जुलै महिन्यात शेवटी पावसाला सुरवात होत होती. गेल्या सात वर्षांत कधीही या परीसरात जून महीन्यात पाऊसही झाला नाही आणि खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहीत.

या वर्षी मात्र वरुणराजाने या परिसरातील शेतकऱ्यांवर कृपादृष्टी दाखावली व रोहिणी नक्षञाच्या शेवटच्या टप्प्यापासूनच पावसाला कमी आधिक प्रमाणात सुरवात झाली आहे. मृग नक्षत्रापासून म्हणजे सात जुनपासून या परिसरात दररोज पाऊस पडत आहे. या आठवड्यात सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसतात येरमाळा, तेरखेडा येडशी, जवळे दुमाला ,दुधगाव खामगाव, कसबे तडवळे परीसरात दररोज रात्री पाऊस पडत असल्याने या परीसरातून वाहत जाणारी तेरणा नदी तुडुंब भरुन वाहू लागली. गेल्या सात वर्षांत पहील्यांदाच तेरणा नदी जून महीन्यात मृग नक्षत्रात भरुन वाहत आहे. विशेषः म्हणजे या तेरणा नदीवर जागोजागी खोलीकरणाचे कामे झालेली आहेत. तरीही खोलीकरण पाण्याने पुर्ण भरल्यानंतर ही नदी वाहु लागली आहे. त्यामुळे पाऊस किती झाला आहे, याचा अंदाज येतो. यावर्षी पावसाला वेळेवर सुरुवात झाल्याने खरीपाच्या पेरण्या देखील वेळेवर होणार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सायकलवरून घेऊन जावा लागला भाचीचा मृतदेह​
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक
बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​