उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीपातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

उस्मानाबाद - जिल्ह्यातील आठपैकी तीन तालुक्‍यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 116.69 टक्के पाऊस परंडा तालुक्‍यात नोंदला गेला आहे. उस्मानाबाद तालुक्‍यात 102.81, तर वाशी तालुक्‍यात 102.15 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.

एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 776.81 मिलिमीटर आहे. आतापर्यंत 711.37 मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या 91.57 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी 72.13 टक्के पाऊस लोहारा तालुक्‍यात नोंदला गेला आहे.

Web Title: ossmanabad marathwada news water lavel increase