पंढरपूरच्या यात्रेसाठी एसटीच्या गाड्या सुसाट

ST-Bus
ST-Bus

तीन दिवसांत ११० बसगाड्या सोडल्या 
औरंगाबाद - पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी गेल्या तीन दिवसांपासून भाविकांची एसटीला प्रचंड गर्दी होत आहे. एसटी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी जिल्हाभरातून जवळपास ११० बस सोडल्या आहेत. 

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची रविवारी (ता. २२) अचानक संख्या वाढल्यामुळे एसटी महामंडळाने तत्परतेने बस उपलब्ध करून दिल्या. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील विविध आगारांत एक स्वतंत्र अधिकारी मार्गदर्शनासाठी नियुक्त करण्यात आला आहे. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी भाविकांना मार्गदर्शन करून पंढरपूरला जाणाऱ्या बसची माहिती देत आहेत. रविवारी एकूण ५३ बस भाविकांना घेऊन पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. सोमवारी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. 

बसचालकांना सुरक्षेच्या सूचना
राज्यातील विविध भागांत मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे गाड्यांवर दगडफेक केल्याच्या घटना होऊ शकतात. म्हणून बसचालकांना आपल्या नजीकच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधूनच बस पुढे घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगारातून पंढरपूरच्या दिशेने सुटलेल्या बसचे अपडेट घेतले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com