परभणीच्या महापौरपदी मीना वरपुडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

परभणी - महापालिकेच्या महापौरपदी मीना वरपुडकर यांची, तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे सय्यद समी ऊर्फ माजू लाला यांची मंगळवारी (ता. 16) निवड झाली.

परभणी - महापालिकेच्या महापौरपदी मीना वरपुडकर यांची, तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे सय्यद समी ऊर्फ माजू लाला यांची मंगळवारी (ता. 16) निवड झाली.

परभणी महापालिकेच्या महापौरपदासाठी मंगळवारी सकाळी विशेष सभा बोलाविली होती. परभणी महापालिकेतील प्रभागांतील जागांसाठी 19 एप्रिलला मतदान झाले होते, तर 21 एप्रिलला मतमोजणी झाली होती. त्यामध्ये 31 जागा जिंकून कॉंग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18, भारतीय जनता पक्षाने आठ, शिवसेनेने सहा तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या होत्या.

मीना वरपुडकर यांना 40 मते पडली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेख आलिया अंजूम यांना केवळ 19 मते मिळाली. मतदान प्रक्रियेत शिवसेनचे पाच, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला.

उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे सय्यद समी ऊर्फ माजूलाला व भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांचे उमेदवारी अर्ज होते. यात माजू लाला यांना 32 मते मिळाली, तर भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ आठ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेतही शिवसेनेचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM