परभणी : पावसाळ्यात घ्या उपकरणांची काळजी

यंत्रणेमधील शॉर्टसर्किटमुळे घडू शकते अप्रिय घटना
Monsoon rainy season equipment short circuit
Monsoon rainy season equipment short circuitsakal

परभणी : वादळी व संततधार अथवा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटतात. ओलीमुळे विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट होऊ शकते. या कारणांमुळे पावसाळ्यात विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा (ट्रान्सफॉर्मर) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

येथे तक्रार करता येईल

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><ConsumerNumber> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

हे करा...

  • पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी

  • घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी

  • फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो.

  • घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा

  • ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये

  • विजेचे स्वीचबोर्ड, उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी

  • विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत

  • विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात

  • विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत, दुचाकी टेकवून ठेवू नये

  • वीजतारांजवळ कपडे वाळत घालू नयेत

  • सार्वजनिक ठिकाणी असलेले फीडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com