परभणीः सेलू तालुक्यात पोळा उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सेलू (परभणी): तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला (बैलांना) सजवून ठिक ठिकाणी आज (सोमवार) गावाच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.

सेलू (परभणी): तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला (बैलांना) सजवून ठिक ठिकाणी आज (सोमवार) गावाच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.

तालूक्यात गेल्या चार वर्षापासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असला तरी यंदा पावसाच्या पुनरागमनाने शेतकर्‍यां मध्ये यंदा उत्साह दिसून आला. खरिपाची पेरणी झाल्यानंतर तब्बल दिड महिना पावसाने ओढ दिली. त्यामुळे मुग, सोयाबीन सारखे पिके वाळून गेली. पोळा हा सण साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांच्या खिशात खडकू देखील नसतांना शेतात रात्रंदिवस राबणार्‍या सर्जा-राजाला (बैलांना) सजावट करून पुरणपोळी खाऊ घालायला शेतकरी मागेपुढे पाहत नाही. परिस्थिती तंगीची असली तरी शेतकरी बैल "पोळा" सण साजरा केला जातो. आदल्या दिवशी खांदेमळणी यानंतर पोळा आणि तिस-या दिवशी पाडवा सण साजरा केला जातो.
पोळ्याच्या दिवशी विविध ठिकाणी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. तालुक्यात पोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्याची पध्दत आहे. गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतक-यांनी बैलांना सजवून आणले होते. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने ठिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मनोभावे बैलांचे औक्षण...
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालूक्यात संततधार पडणा-या पावसाने सोमवारी पोळा साजरा करण्यासाठी थोडी विश्रांती दिल्याने शेतक-यांचा आनंद द्विगुणित झाला होता.वर्षभर शेतात राब राब राबणार्‍या सर्जा-राजाला (बैलांना) शेतक-यांनी सजवून त्यांची मनोभावे पूजा करीत मिरवणूक काढली तर महिलांनी औक्षण केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: parbhani news bail pola festival celebrate in selu