धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दावा दाखल करणार - गुट्टे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

परभणी - गंगाखेड शुगर्स कारखान्याने केवळ अडीच एकरच्या सातबारावर 502 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला; मात्र त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक हजार कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दोन दिवसांत दाखल करणार असल्याची माहिती "गंगाखेड शुगर्स'चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी आज येथे दिली.

"गंगाखेड शुगर्स'ने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. आता हे प्रकरण विधान भवनापर्यंत पोचले आहे. शुक्रवारी (ता. 28) विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी "गंगाखेड शुगर्स'वर आरोप करत अडीच एकरच्या सातबारावर 502 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचे सांगितले होते. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी गुट्टे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुंडे यांनी केलेले आरोप हे खोटे असून, आपणास बदनाम करण्याच्या प्रयत्न आहे. मुंडे यांच्याविरुद्ध एक हजार कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: parbhani news crime on dhananjay munde by ratnakar gutte