परभणी : कपडे दोरीवर टाकताना शॉक बसून विवाहितेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सोनटक्के यांना तत्काळ सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात अाले. ते मृत झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मस्के यांनी घोषित केले.

सेलू : कपडे दोरीवर वाळत घालताना विजेचा धक्का लागून एका विवाहितेचा मृत्यू झाला. ही महिला तालुक्यातील डासाळा येथील रहिवाशी असून शुक्रवारी (ता.९) रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आक्मसिक मृत्यूबद्दल डासाळा गावात हळहळ व्यक्त होत अाहे.

डासाळा येथील रहिवाशी प्रियंका बालासाहेब सोनटक्के (वय २५) या शुक्रवारी त्यांच्या दिनचर्येप्रमाणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातील कामे करत असताना धुण्याची कपडे घरावरील दोरीवर वाळत घालत असताना अचानक लगतच असलेल्या घरावरील लोखंडी पत्रात विजेचा प्रवाह उतरल्याने प्रियंका सोनटक्के यांना जोराचा धक्का लागला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.

त्यांना तत्काळ सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात अाले. ते मृत झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मस्के यांनी घोषित केले. प्रियंका सोनटक्के यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांचे माहेर मानवत येथील असून, त्यांना दहा महिन्याचा लहान मुलगा अाहे. या घटनेने डासाळा गावावर शोककळा पसरली.