परभणीः अल्पभूधारक युवा शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या छोट्याशा गावातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

बरबडी (ता. पूर्णा) येथील तरुण शेतकरी लक्ष्मण गणेश सोलव (वय २२) हा आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता शेतात गेला व त्याने साडेनऊच्या सुमारास त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

आजूबाजूच्या शेतातील शेतकरी, मजूर धावले. परंतु, तो पर्यंत त्याची जीवनयात्रा संपली होती. त्याच्या मागे आई, वडील, एक भाऊ व एक बहीण आहे. दोघा भावात मिळून तीन एकर जमीन आहे. त्यांच्या कुटुंबावर साठ हजाराचे कर्ज असल्याची माहिती त्याच्या कुटूंबातून मिळाली. सततची नापिकी व कर्जामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :