परभणीत ब्राह्मणगाव येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

या आंदोलकांनी दहशत निर्माण करून वाहनातील दूधाचे पाकीटे फोडून 25 हजारांचे नुकसान केले. सोबत आकडे लिहीलेले दोन हजार रूपये किंमतीचे दुध पाकीटे जबरदस्तीने घेवून गेले.

परभणी : ब्राह्मणगाव (ता.परभणी) येथे टँकरमधील दुधाटे पाकीटे ओतून नुकसान केल्याप्रकरणी रविवारी (ता.4) 56-70 शेतकरी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दूध विक्री प्रतिनिधी सतीश धाडपे यांनी परभणी ग्रामीण पोलिसांत या प्रकरणी फिर्याद दिली.

श्री धाडपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ता.3 जून रोजी मध्यरात्री दीड वाजता दुधाचे पाकीटे घेवून जाणारा एमएच-17 एजी- 6906 क्रमांकाचे वाहन शेतकरी आंदोलकांनी जबरदस्तीने आडविले. या आंदोलकांनी दहशत निर्माण करून वाहनातील दूधाचे पाकीटे फोडून 25 हजारांचे नुकसान केले. सोबत आकडे लिहीलेले दोन हजार रूपये किंमतीचे दुध पाकीटे जबरदस्तीने घेवून गेले. त्यातून 25 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याची माहिती पोलिस कर्मचारी श्री घुले यांनी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी 56-70 आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमादार मेहबूब खाँ पठाण अधिक तपास करीत आहेत.