किक बॉक्सिंगमध्ये पाच गोल्ड, चार सिल्व्हर मेडल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

किक बॉक्सिंग कराटे अॅकॅडमी गोवा यांच्या वतीने २० ते २३ मे दरम्यान, वेगवेगळ्या वजन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.  

जिंतूर : मागील आठवड्यात गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग कराटे स्पर्धेत जिंतूरचे दहा कराटेपटू चमकले. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून पैकी पाच जणांनी गोल्ड मेडल तर चार जणांनी सिल्व्हर मेडल मेडल पटकाविले.

किक बॉक्सिंग कराटे अॅकॅडमी गोवा यांच्या वतीने २० ते २३ मे दरम्यान, वेगवेगळ्या वजन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.  यामध्ये आदिनाथ नागरे (३६ ते ४० वजन गट), विष्णू साबळे (गट ५१ ते ५५), रोहित वाकळे (गट २१ ते २५), विशाल आव्हाड (गट ५६ ते ६०), मुकुंद डोईफोडे (गट ४१ ते ४५) हे गोल्ड मेडल तर संतोष मते (गट १६ ते २०), राजकिरण रोडे (गट ३१ ते ३५), सविता सांगळे (गट ३० ते ३५), गीता भांड (गट ३६ ते ४०), ऋषी घुगे ( गट ४६ ते ५०) यास ब्रांझ पदकावर समाधान मानावे लागले.

यशस्वी कराटेपटू त्यांचे पालक व प्रशिक्षकांचे पोलिस निरीक्षक यू. सी. शेख, फौजदार निरगुडे, ग्रॅंड मास्टर आबुसाद, मुख्य प्रशिक्षक संतोष जाधव यांनी कौतुक केले.