स्वच्छता मोहिमेत अनासपुरेंचा सहभाग

स्वच्छता मोहिमेत अनासपुरेंचा सहभाग

परभणी - शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच जनजागृतीसाठी बुधवारी (ता. २२) नाम फाउंडेशनचे व अभिनेते मकरंद अनासपुरे, महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी हातात झाडू, खोरे घेऊन परिसराच्या स्वच्छतेला हातभारल लावला.

महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र स्वच्छ अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत टाकण्यासाठी समाजातील विविध घटकांची मदत घेतली जात असून सभा, फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी (ता. २२) महापालिका, जलमित्र संघटनेच्या वतीने गव्हाणे चौकातून स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. आयुक्त रेखावार, उपायुक्त डाॅ. विद्या गायकवाड, स्वच्छतेसाठी परभणी महापालिकेचे 

ब्रॉंड अॅम्बेसिडर डॉ. राजगोपालजी कालानी यांच्या नेतृत्वात शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी, महिलानी व महापालिका कर्मचार्यांनी मिळून आज गव्हाने चौक ते नारायण चाळ व नीरज हॉटेल समोरिल कुंड्यांची साफसफाई केली. जवळपास चार घंटा गाड्या व एक ट्रॅक्टर भरून कचरा जमा करून गाडीत टाकला. या मोहिमेत सिनेअभिनेते अनासपुरे यांनीदेखील हातात झाडू घेऊन सहभाग नोंदविला. नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेसाठी जागरूक राहवे, घरासमोरील कचरा नालीत न टाकता घंटा गाडीत टाकावा, प्रत्येक व्यापाऱ्याने दुकानात डस्टबीन ठेवावे, ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा वेगळा करूनघंटा गाडीच्या वेगवेगळ्या कप्प्यात कचरा टाकावा, असे आवाहन या वेळी श्री. अनासपुरे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com