परभणीः रिपब्लीकन सेनेचा महानगरपालिकेला घेराओ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

परभणीः सार्वजनिक शौचालयाची बांधकामे तात्काळ पूर्ण करा, वैयक्तिक शौचालयाचे पूर्ण अनुदान द्या, गुडमॉर्निंग पथकांना स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार) रिपब्लीकन सेनेने महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला.

परभणीः सार्वजनिक शौचालयाची बांधकामे तात्काळ पूर्ण करा, वैयक्तिक शौचालयाचे पूर्ण अनुदान द्या, गुडमॉर्निंग पथकांना स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार) रिपब्लीकन सेनेने महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला.

महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहिम सुरु असून शहरातील 55 जागांवर येणाऱ्या नागरीकांवर गुडमाॅनिंग पथके कारवाई करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिपल्बीकन सेनेने राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढला. दहा जुनपर्यंत शौचालयाची बांधकामे करणाऱ्यांना 27 हजार रुपये अनुदान निश्चित झाले होते. त्याची उर्वरीत रक्कम देण्यात यावी, पूर्ण अनुदान देऊन मुदतीत बांधकाम न झाल्यास कारवाई करावी, तोपर्यंत कारवाई थांबवावी, शौचालय धारकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन द्यावी, रमाई घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावी, कॅनाल लगतच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. रस्ते, नाल्या देण्याची मागणीही लावून धरली.

महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी मोर्चेकरी नागरीकाशी हितगुज साधली. मोर्चातील महिलांनी जोपर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठे जाणार ? सार्वजनिक शौचालयाचे बांधकामे का पूर्ण होत नाहीत ? या सह अनेक प्रश्न यावेळी मांडले.

श्री. रेखावार यांनी योजनेच्या नियम व अटी सांगीतल्या. ज्यांची बांधकामे पूर्ण झाली, त्यांना तात्काळ अनुदान देण्याचे आश्वासन दिले. ज्यांनी अद्यापही अर्ज दिले नाही, त्यांना अर्ज द्यावे, त्यांनाही अनुादन देण्याचे आश्वासन दिले. शौचालये आपल्यासह शहराच्या आरोग्यासाठी आवश्यक असून त्यासाठी नागरीकांमध्ये निर्माण झालेल्या जनजागृतीचे देखील यावेळी रेखावार यांनी कौतुक केले. माफक दरात वाळूसाठी आपण जिल्हा प्रशासनाशी बोलत असून एक-दोन दिवसात निर्णय होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

श्री. वरपुडकर यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करुन वैयक्तिक शौचालयाचे अनुदान तात्काळ खात्यावर टाकण्याचे व रमाई घरकुल योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. य़ा मोर्चात चंद्रकांत लहाने, सिध्दार्थ कसारे, अरुण लहाने, बी.एच. कांबळे, रमेश भिंगारे, निलेश डुमणे, राहुल खांबळे, सरुबाई जमदाडे, सुमन सोनटक्के, सखुबाई नरवाडे, शांतबाई रणविर, सुमन भालेराव, दगडूबाई झोडपे, चतुराबाई ठोके यांच्यासहया मोर्चात मोठ्या संख्येने महिला, नागरीक सहभागी झाले होते.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :