परभणीः साश्रूनयनांनी जवान छोटुलाल डुबे यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सोनपेठ (परभणी): डिघोळ येथील जवान छोटुलाल डुबे यांच्यावर आज (गुरुवार) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

तालुक्यातील डिघोळ येथील छोटुलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे (वय ४६) यांचे बुधवारी (ता. 26) पहाटे अल्पशा आजाराने दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दुखद निधन झाले होते. ते भारताच्या सीमेवर कार्यरत होते. तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दोन दिवसापुर्वी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सकाळी डिघोळ या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला. या वेळी सोनपेठ व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जमावाने छोटुलाल डुबे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.  छोटुलाल 1988 मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तान सीमेवर ते कार्यरत होते. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे कार्यरत होते. मराठा बटालियन मध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ वृत्तीच्या छोटुलाल यांनी सैन्यात भरती होण्यासाठी अनेकांना मदत केली होती. सोनपेठ परीसरातील अनेक तरुण त्यांच्यामुळेच सैन्यात  भरती झाले आहेत.

छोटुलाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी सोनपेठ उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार जिवराज डापकर, पोलिस उप निरीक्षक बाबूराव जाधव, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष राजेश विटेकर, शिवाजी मव्हाळे, बालाप्रसाद मुंदडा, रंगनाथ रोडे, मराठा बटालियनचे अधिकारी यांच्यासह तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, शासकीय कर्मचारी सोनपेठ तसेच हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: