सोनपेठ बाजारपेठ आज कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

सोशलमिडीयावर महापुरुषांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकुर प्रकरण

सोनपेठ (परभणी): सोशलमिडीयावर महापुरुषांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकुर टाकल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोनपेठ बाजारपेठ बंद ठेऊन निषेध सभा घेण्यात आली.

सोशलमिडीयावर महापुरुषांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकुर प्रकरण

सोनपेठ (परभणी): सोशलमिडीयावर महापुरुषांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकुर टाकल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोनपेठ बाजारपेठ बंद ठेऊन निषेध सभा घेण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने राष्ट्रपती व महापुरुषांच्या विरूद्ध सोशलमिडीयावर मजकुर टाकल्याने शहरातील वातावरण अतिशय गढुळ झाले आहे. शहरातील एका व्हाट्सअप ग्रुपवर राष्ट्रपती विरुद्ध अक्षेपार्ह मजुकर टाकल्या बद्दल सोनपेठ पोलिसात दोघा जणाविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर आठवडाभरातच फेसबुकवर महापुरुषांच्या विरुध्द अक्षेपार्ह टिप्पणी केल्या बद्दल अजुन एका शिक्षका विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (शुक्रवार) राष्ट्रपती विरुद्ध अक्षेपार्ह टिप्पणी केल्या बद्दल शहर बंद ठेवण्यात आले.

यावेळी निषेध सभा ही घेण्यात आली. या सभेस भाजपाचे रमाकांत जहागीरदार, शिवाजी मव्हाळे, रंगनाथ सोळंके, महादु गिरे, सुशील रेवडकर, दिलीप वाणी पाटील, अजित देशमुख, मिनाताई सावंत, शरद केंद्रे, मंगेश मुळी या सह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक आंदोलनात बाजार पेठ बंद ठेवल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आधीच दुष्काळात होरपळुन निघालेल्या व्यापाऱ्यांचे बंद मुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन महिन्यात आता पर्यंत चारदा बाजारपेठ विविध आंदोलनात बंद ठेवण्यात आली असून, या सोशलमिडीया प्रकरणात अजून दोन बंदचे इशारे देण्यात आले आहेत.

Web Title: parbhani news sonpeht market and social networking