परभणी: चोरून आणलेल्या दुचाकी विकतांना तीन चोरट्यांना अटक

परभणी: चोरून आणलेल्या दुचाकी विकतांना तीन चोरट्यांना अटक
परभणी: चोरून आणलेल्या दुचाकी विकतांना तीन चोरट्यांना अटक

तब्बल बारा दुचाकी जप्त, शहर पोलिसांनी कारवाई

जिंतूर (परभणी) : इतरत्र चोरून आणलेल्या दुचाकी जिंतूर परीसरातील नागरिकांना विकणाऱ्या तीन चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल बारा दुचाकी,एक एकर डन,दोन तलवारी व रोख २९ हजार ९००रुपये असा एकूण सुमारे चार लाखाचा ऐवज ऐवज जप्त केला. सदरील माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.    

तालुक्यातील पुंगळा येथील राहणार अनिकेत दिगाम्बर जगताप (वय २०) हा तरुण काही दिवसातच दुचाकी गाडी बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता तो गाड्या चोरून कमी दरात अन्य लोकांना विकत असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार स.वाजीद उर्फ सलमान स.गफूर रा जिंतूर याच्या सोबत मिळून गाड्या चोरी केल्याची कबुली देऊन त्याच्याकडील तीन चोरी करून आणलेल्या मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या.व शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या स.वाजीद उर्फ सलमान याच्या घरी छापा मारला असता त्याच्याकडे चोरी केलेल्या ९ दुचाकी, दोन तलवारी, एक एअर गन, दोन जंबीये, पाच बनावट नंबर प्लेट  मिळून आले असता पोलिसांनी त्यास ही ताब्यात घेऊन विचारपूस केली तेंव्हा त्याने त्यांचा तिसरा साथीदार आदिनाथ रामदास बैकरे (रा. बोडार, ता. जि. नांदेड) याचे नाव सांगितले त्यावरून पोलिसांनी त्यास नांदेड येथून ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याचे कबूल करून अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितले ते दोघे फरार असल्याने पोलिसांनी त्या बाबत गुप्तता बाळगत नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली. मोठ्या शहरातून अथवा गर्दीच्या ठिकाणाहून गाड्या चोरून लगेच त्याची नंबरप्लेट बदलून ती कमी दरात विकन्याचा या आरोपींचा धंधा असून यातील मुख्य आरोपी फरार असून ते हाती लागल्यास मोठ्या गाड्या चोरीचा पर्दा फाश होण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक  व्यकंटेश अलेवार, शेख, फौजदार सुरेश नरवाडे, रामदास निर्दोडे, उदय सावंत, दत्ता काणगुले, पोलिस कर्मचारी अशोक हिंगे, बिलाल, सूर्यवंशी, जरार, गजभारे, पुंडगे, गजानन राठोड, अशोक कुटे, बुधवंत, जोगदंड, जाधव, कांबळे, अजगर, शेख ताज, नरवाडे, अघाव, काकरवाल, शिंदे, वाघमारे, घुगे, धबडे, जीवने, लबडे, सायबर सेलचे गणेश कउटकर, राठोड यांनी केली आहे.

नागरिकांनी पोलिसांची संपर्क साधावा: प्रवीण मोरे
शहर पोलिसांना दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले असून या गुन्हेगाराकडून अनेक चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचे दोन मुख्य साथीदार फरार असून त्यांना पकडल्या नंतर आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, जिल्ह्यासह, शहर व परिसरात ज्या नागरिकांच्या दुचाकी गाड्या चोरीस गेल्या आहेत, अशा नागरिकांनी जिंतूर पोलिस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com