परभणी: पारवा येथे दोन मुली गेल्या वाहून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात पडल्या. दरम्यान ही घटना प्रत्यक्षदर्शीने पाहिली. या बाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्यानंतर, ग्रामस्थांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पालम (जि. परभणी) : पारवा (ता.पालम) येथे रविवारी (ता.२०) मध्यरात्री बारापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत असून, पारवा येथे दोन मुली वाहून गेल्याची घटना घडली आहे.

यामध्ये पारवा (ता.पालम) येथील आम्रपाली भगवान येवले (वय १२) आणि किर्ती भगवान येवले (वय १९) या दोन चुलत बहिनी सकाळी साडेसात वाजता पुलावरुन गेल्या.

पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात पडल्या. दरम्यान ही घटना प्रत्यक्षदर्शीने पाहिली. या बाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. परंतु त्यांचा शोध लागला नाही. शोधमोहीम अद्याप चालू आहे.

टॅग्स