परभणी: पावसामुळे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाऊसाचे आगमन झाल्याने नद्या नाल्यांना ओढ्याना पाणी आल्याने तुर्त तरी पाणी टंचाईचे संकट टळले.आहे. मुग, सोयाबीन, उडीद अशी काही पिके पावसाअभावी गेल्यात जमा असली तरी तूर, कापुस, भाजीपाला, फळबागा, हळद, उस अशा काही पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. 

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील प्रभावती चंद्रकांत गायकवाड या महिलेचा रात्री झोपेतच घराची भिंत अंगावर पडुन मृत्यू झाला.

दडी मारून बसलेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर दमदार हजेरी शनिवार (ता.१९) पासून लावली असून तालुक्यात रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत ६७.६० मिलिमीटर पाऊस पडला. त्यात चुडावा ७७, पूर्णा ७८ ,कातनेश्वर ३०, ताडकळस ७३, लिमला ८० याप्रमाणे पाऊस पडला असून रविवारी ही जोरदार पाऊस पडत आहे. धानोरा काळे येथे मध्यरात्री घराची भिंत कोसळून प्रभावती चंद्रकांत गायकवाड या पंचावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश लांडगे यांनी दिली.

दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाऊसाचे आगमन झाल्याने नद्या नाल्यांना ओढ्याना पाणी आल्याने तुर्त तरी पाणी टंचाईचे संकट टळले.आहे. मुग, सोयाबीन, उडीद अशी काही पिके पावसाअभावी गेल्यात जमा असली तरी तूर, कापुस, भाजीपाला, फळबागा, हळद, उस अशा काही पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. 

कच्चे मातीचे घरे तसेच धोकादायक इमारतीचा वापर नागरिकांनी टाळावा. विद्युत तारा पासूनही स्वतःस जपावे.पूर आलेल्या नद्या, नाले, ओढ्यातून जायचे टाळावे असे आवाहन तहसीलदार शाम मदनूरकर यांनी केले आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :